यावल : करोना संशयीत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार

मयताच्या मुलासह इतरांवर गुन्हा दाखल
यावल : करोना संशयीत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार

यावल - प्रतिनिधी

यावल तालुक्यातील कोरपावली येथील एक ७२ वर्षीय इसम कोव्हिड संशयित म्हणून गोदावरी हॉस्पिटल मध्ये औषधोपचार घेत असताना मयत झाल्या नंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता.

रिपोर्ट येण्या आधीच मृत देह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने मयताच्या मुलाने त्याचे घरी व व कब्रस्तान मधील सार्वजनिक जागेवर अंदाजे 100 लोकांची गर्दी करून जिल्हाधिकारी जळगाव यांनी जारी केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 चे उल्लंघन केलेले आहे म्हणून कोरपावली तालुका यावल येथील पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला मयताच्या मुला विरुद्ध आज दि.2 जुलै 2020 गुरुवार रोजी सकाळी 1 ते 2 वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com