चाळीसगाव : आमदारांच्या कार्यालयात करोनाची धडक
जळगाव

चाळीसगाव : आमदारांच्या कार्यालयात करोनाची धडक

वाढणारी रुग्णसंख्या धोकादायक

Rajendra Patil

चाळीसगाव । प्रतिनिधी

चाळीसगाव शहरासह तालुक्यात मंगळवारी नवीन पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. यात शहरातील सिंधी कॉलनी, जयबाबाजी चौक दोन जण तालुक्यातील बिलाखेड व भोरस येथे प्रत्येक एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे यांनी दिली आहे. तसेच भोरस येथील कोरोना पॉझिटिव्ह महिला ही आमदारांच्या कार्यालयात काम करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

शहरात गेल्या चार दिवसात नवीन 10 रुग्णांना कोरोना बाधा झाली असून दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या शहरावासियांसाठी धोकादायक आहे. चाळीसगाव कोरोना हॉटस्पॉट होण्यापासून वाचविण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याची अत्यंत गरज आहे.

चाळीसगाव कालच दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात शहरातील काल मयत झालेल्या वृध्दाचा व तालुक्यातील पिलखोड येथील एक पुरुषाला कोरोना लागन झाल्याचे सिध्द झाले होते.

पुन्हा शहरातील सिंधी कॉलनी येथील एक कापड व्यापारी नाशिक येथे आज कोरोना पॉझिटिव्ह आढळुन, तर जयबाबाजी चौकतील कोरोनाग्रस्त वडिलांच्या संपर्कात आलेल्या एक लहान मुलगा व एक 27 वर्षीय महिलेला कोरोनाची बांधा झाली. तसेज तालुक्यातील बिलाखेड येथील एका 50 वर्षीय पुरुष व भोरस येथील 22 वर्षीय महिला अशा दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या स्वॅबचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या 37 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब येवून ते तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहेत.

आमदारांच्या कार्यालयात कोरोनाची धडक- चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांचे अंत्योदय या पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी काम करणार्‍या भोरस येथील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे चाळीसगाव पहिल्यादाच एका राजकिय व्यक्तीच्या कार्यालयात कोरोनाने धडक दिल्याने शहरात विविध चर्चांना ऊत आला आहे. आ. मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात नेहमीच कार्यकर्त्यांची व नागरिकांची कामानिमित्ताने गर्दी असते. त्यामुळे तालुकावासियांसाठी ही धोकेदायक बाब आहे. आमदारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी खबरदारी घेण्याची गजर आहे.

आतापर्यंत 42 जणांना करोनाची बाधा

चाळीसगाव शहरासह तालुक्यात आतापर्यंत 42 जणांना कोरोनाची बांधा झाली आहे. त्यात सर्वात जास्त रुग्ण हे गोपाळपुरा व हुडको परिसरात आढळुन आले आहेत. तर तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

20 जणांची करोनावर यशस्वी मात

कोरोनाग्रस्त 20 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील भडगावरोड स्थित अंधशाळेत असलेल्या कोविड केअर सेन्टरमधून चांगल्या पद्धतीने उपचार मिळत असल्याने 20 जणांना कोरोनामुक्त झाले आहेत. त्या कोविड सेन्टरमधून घरी सोडण्यात आले आहे.

तीन नवीन कंटेनमेंट झोन

शहरातील सिध्दी कॉलनीसह तालुक्यातील बिलाखेड, भोरस येथे प्रत्येक एक रुग्ण आढळुन आल्याने रुग्ण राहत असलेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी तहसीलदार अमोल अमोल मोरे, वैद्यकिय अधिकारी डॉ.डी.के.लांडे, डॉ.बी.पी.बाविस्कर व आशासेवीक आदिचे पथक गेले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेवून तो परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला आहे. तालुक्यात नव्याने तीन कटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण 19 कटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com