करोनाच्या संकटात ग. स. सोसायटीचा मदतीचा हात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश सुपूर्द
करोनाच्या संकटात ग. स. सोसायटीचा मदतीचा हात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटी जळगाव या संस्थेकडून कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून 27 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रक्कम रुपये 11,11,111 ( अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा) रुपयांचा चेक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांच्याहस्ते देण्यात आला.

यावेळी ग.स.संस्थेचे प्राधिकृत अधिकारी मंडळप्रमुख विजयसिंह गवळी, प्राधिकृत अधिकारी सदस्य प्रशांत विरकर,भाऊसाहेब महाले, व्यवस्थापक एस.आर.पाटील, स्वीयसहाय्यक एन.,स.पाटील, हेमंत नारखेडे, संस्थेचे कर्मचारी निंबा सोनवणे, लेखापाल वाल्मीक पाटील,प्रशासन अधिकारी शामकांत सोनवणे, उपशाखाधिकारी अमोल जोशी आदी उपस्थित होते.

एक पाऊल पुढे येण्याची अपेक्षा

आशिया खंडातील प्रसिद्ध असलेल्या ग.स.सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासकराज विराजमान झालेले आहे.

सध्या ग.स.सोसायटीवर तीन प्रशासक असलेतरी कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केला असून संकट काळात ग.स.सोसायटीने एकप्रकारे मदतीचा हात दिला आहे.

सहकार क्षेत्रातील इतर सेवाभावी संस्थांनी मदतीसाठी एक पाऊल पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com