जळगाव - Jalgaon

स्थायी सभेत खड्डे, अमृतच्या योजना, रस्त्यांच्या प्रश्नावर महासभेत प्रशासन व विरोधकांत चांगलेच वादंग झाले. शिवसेना नगरसेवकांनी या प्रश्नांवर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

पुढील स्थायी सभेपर्यंत सर्व प्रश्न सुटतील असेे आश्वासन प्रशासनातर्फे आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी विरोधकांना दिले व समस्या वेळच्या वेळी सुटाव्यात अशा सूचना आयुक्तांनी अधिकार्यांना दिल्या. व्यासपीठावर सभापती राजेंद्र घुगे पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे, उपायुक्त संतोष वाहुळे, उपायुक्त प्रशांत पाटील उपस्थित होते.

मनपात दोन प्रस्ताव मंजुरीसह प्रशासनाकडून आलेल्या तीन संविदा चर्चेसाठी ठेवण्यात आल्या होत्या. वकील नियुक्ती व आगीचे प्रस्ताव असे दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर संविदाही मंजूर करण्यात आल्या.

मनपाची औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव

मनपाने जुन्या भुसंपादनाच्या वादात तिसर्यांदा न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मनपाला जवळपास १५ कोटी रुपये वाचविण्यासाठी सिनिअर कौन्सिलरची नियुक्ती करणे गरजेचे आहे व याबाबतचा प्रस्ताव स्थायीसह महासभेत मंजूर होणे क्रमप्राप्त असल्याने या प्रस्तावावर स्थायीत चर्चा करण्यात आली.

प्रारंभी नवनाथ दारकुंडे यांनी या मुद्दास आक्षेप घेतला मात्र आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी हा प्रस्ताव पारित करणे मनपाच्या हिताचेच असल्याची माहिती सभागृहाला दिल्याने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. औरंगाबाद उच्च न्यायायलयात याच महिन्यात मनपातर्फे ४ जानेवारीला याचिका दाखल करण्यात आली आहे.