जिल्हा बँकेची निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणार

जिल्हा कॉंग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्धार
जिल्हा बँकेची निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणार

जळगाव - Jalgaon

शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्र शासनाने कामे केली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. ही उणीव भरुन काढण्यासाठी आगामी होणार्‍या (District Bank Election) जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस (Congress) स्वतंत्र पॅनल निर्माण करुन जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील (Adv. Sandeep Patil) व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील (Former MP Dr. Ulhas Patil) यांनी कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhary) ,प्रदेश सचिव डी.जी.पाटील, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, जिल्हा बँक संचालक डॉ.सुरेश पाटील,माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, माजी जि.प.सदस्य आर.जी. पाटील, विजय महाजन, अशोक खलाणे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, एस.टी. पाटील, विकास वाघ, जमील शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष शामकांत तायडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com