कांदा निर्यात बंदीचा काँग्रेसने केला निषेध

शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी
कांदा निर्यात बंदीचा काँग्रेसने केला निषेध

भुसावळ । प्रतिनिधी Bhusawal

जगभरात लाकडाऊन असतांना मोठ्या कष्टाने शेतकर्‍यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आता चांगला भाव येवू लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी शेतकर्‍यांना आशा होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकार ने अचानक निर्यात बंदी जाहिर करून शेतकर्‍यांवर घोर अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने...

केंद्र सरकारचा निषेध करत तहसूलदार दीपक धिवरे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात, 4 जुन 2020 रोजी केन्द्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जिवनावश्यक वस्तुंच्या यादीतुन वगळले असल्याची घोषणा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आणि तीन महिण्यात घुमजाव करून निर्णय बदलुन शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे.

या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळुन शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे तरी कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा जाहिर निषेध करीत सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रविंद्र निकम, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुनव्वर खान, प्रदेश संयोजक भगवान मेढे राजेंद्र श्रीनाथ, शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, विलास खरात, महेंद्र महाले, किशोर जाधव, सूकदेव सोनवणे, प्रदिप नेहते, जॉनी गवळी, नारायण भोई, अल्पसंख्याक शहराध्यक्ष सलीम गवळी, युवक विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, जिल्हा महिला सरचिटणीस राणी खरात, महिला जिल्हा उपाध्यक्ष हमिदा गवळी, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे उपस्थित होते.

अनु.जाती विभाग काँग्रेस-केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात जिल्हा अनु.जाती विभागातर्फे येथील प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी योगिता गोरडे यांच्यासोबत चर्चा करुन जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदिप पाटील यांच्या सुचनेनुसार तसेच योगेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील भाजप सरकारने शेतकर्‍यांच्या कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.

यावळी जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, इस्माईल गवळी, महेबूब खान, गफुर गवळी, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, कुणाल सुरळकर, विक्रम वानखेडे, सुजाता सपकाळे, सपना पगारे यांच्यसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावल - केंद्र शासनाने कांद्यावर लावलेली निर्यात बंदीच्या निषेधार्थ तालुक्यातील शेतकरी संघटनेच्यावतीने येथील तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाने काढलेल्या अध्यादेशाची प्रत व कांदा जाळत केंद्र शासनाचा निषेध केला. निर्यातबंदी मागे घ्यावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना दिले. याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे खान्देश विभाग प्रमुख कडूआप्पा पाटील, प्रमोद रामराव पाटील, पिंटू काटे, रमेश विश्वनाथ चौधरी नायगाव, नारायण चौधरी, उदय चौधरी, बापूराव काटे, निर्मल चोपडे, भूषण फेगडे यांचेसह शेतकरी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com