इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

आ.शिरीष चौधरीसह प्रमुख पदाधिकार्ऱ्यांनी यांनी सायकल चालवून केला मोदी सरकारचा निषेध
इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

रावेर|प्रतिनिधी Raver

पेट्रोल डिझेलची (Petrol diesel price) दरवाढ सर्वसामान्य जनतेला परवडणारी नसून,यापासून महागाई वाढली आहे.भाव कमी करावेत अन्यथा काँग्रेसकडून यापेक्षा व्यापक स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा देत काँग्रेस पक्षाच्यावतीने (Congress party) सोमवारी रावेरमध्ये सायकल रॅली पार पडली.या रॅलीचे नेतृत्व आ.शिरीष चौधरी यांनी केले.

येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून सायकल रॅली निघाली,शहरातील प्रमुख रस्त्यावरून आमदार चौधरी आणी कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात घोषणाबाजी केली.यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, बाजार समितीचे माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील,माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी,मिलिंद पाटील,महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पाचपांडे,उपाध्यक्ष मानसी पवार,प्रतिभा मोरे, कांता बोरा,मुंजलवाडी सरपंच योगेश पाटील,सूर्यभान चौधरी,वाघोड येथील गुणवंत सातव,संतोष पाटील,राजू सुवरने,योगेश गजरे,भुपेंद्र जाधव,दिलरुबाब तडवी,यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com