जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय रणनिती

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे धुरा; आज बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार
जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय रणनिती

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यात शिवसेना, Shiv Sena राष्ट्रवादी काँग्रेस NCP आणि काँग्रेस Congress या पक्षांची आघाडी असून, भाजपा bjp राज्यात विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावत आहे. मात्र जिल्हा बँकेच्या District Bank आगामी होणार्‍या निवडणुकीसंदर्भात Election सर्वपक्षीय पॅनलचे All-party panel नेतृत्व पालकमंत्री गुलाबराव पाटील Guardian Minister Gulabrao Patil करीत असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची सोमवार 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता अजिंठा विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर असून या सर्व पक्षीय पॅनलचे नेतृत्व गेल्या पाच वर्षांपासून एकनाथराव खडसे यांच्याकडेच होते. आताही सर्व पक्षीय पॅनल आस्तित्वात आणण्यासाठी खडसे यांची भूमिका सकारात्म असून आणखी पुढील पाच वर्षासाठी येणार्‍या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय पॅनल व्हावे, अशी सर्वांची अपेक्षा असल्याचे खडसे यांनी सूतोवाच केले आहे.

यासंदर्भात मुंबई येथे एकनाथराव खडसे यांची जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेतली असून मागच्या कालखंडामध्ये सर्व पक्षीय पॅनल व्हावे यासाठी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पुढाकार घेत असून त्यांना आम्ही सर्व मिळून सहकार्य करू, अशी भूमिका खडसे यांनी घेतली आहे.

त्यामुळे आता 30 ऑगस्ट रोजी सर्व पक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेली आहे. या सर्वपक्षीय प्रमुखांच्या बैठकीत काय चर्चा होणार? कोणाच्या वाटेला किती जागा मिळणार? कोणकोणत्या पक्षातील सर्व पक्षीय नेत्यांचा या पॅनलमध्ये समावेश राहणार? याविषयी उत्सुकता लागून आहे.

प्राथमिक चर्चा अन् खलबते

जिल्हा बँकेसंदर्भात आयोजित बैठकीस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांची भूमिका काय राहणार? या विषयी चर्चा होणार आहे. जिल्हा बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलच्या निवडणुकीसाठी ही प्राथमिक चर्चा असून, या बैठकीत सर्वपक्षीय पॅनलची निर्मिती होईल की नाही? या बैठकीनंतर स्पष्ट होणार असल्याचे संकेत सर्वपक्षीय नेत्यांनी दिले आहे.

नेत्यांच्या निर्णयाकडे राहणार लक्ष

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वपक्षीय पॅनल निर्मितीसाठी भाजपाचे नेते आमदार गिरीश महाजन, राजूमामा भोळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीष पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील उपस्थित राहतील.

सहकार क्षेत्रातील दिग्जांमध्ये उत्सुकता

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्व पक्षीय पॅनल आस्तित्वात असून माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा होती. आता मात्र सर्व पक्षीय पॅनलचे नेतृत्व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे करणार असून सर्व पक्षीय पॅनल हाच पायंडा कायम ठेवण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय पॅनलची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीकडे सहकार क्षेत्रातील दिग्जांच्या नजरा लागून आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वपक्षीय पॅनलच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीसाठी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना या सर्वपक्षीय प्रमुखांना बैठीकचे निमंत्रण दिलेले आहे.
गुलाबराव पाटील, पालकमंत्री
जिल्हा बँक सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांकडून निमंत्रण आलेले आहे. या बैठकीला माजी मंत्री नाथा भाऊ, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील आदीं नेते उपस्थित राहतील.
अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वपक्षीय पॅनलची बैठक सोमवार दि. 30 ऑगस्ट रोजी आयोजित केलेली आहे. या बैठकीचे पालकमंत्र्यांकडून निमंत्रण आलेले आहे. बैठकीत काय चर्चा होते. ते बघू आणि नंतर भाजपा स्वतंत्रपणे मैदानात राहील.
गिरीश महाजन, आमदार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीसाठी निमंत्रण आलेले असून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.शिरीष चौधरी, डॉ.उल्हास पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहतील. प्राथमिक चर्चेनंतर काँग्रेस भूमिका स्पष्ट करेल.
अ‍ॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com