तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन

जळगाव - Jalgaon

नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीमध्ये तालुका, जिल्हाधिकारी, महानगरपालिका व विभागीय आयुक्तस्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन दूरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferancing) करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

Title Name
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ऑनलाईन होणार
तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

त्यानुसार जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवार, 3 मे, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता दूरचित्रवाणी परिषदेव्दारे होणार आहे. या लोकशाही दिनात नागरीकांना तक्रार दाखल करावयाची असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात वेळेतवर उपस्थित रहावे. असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Title Name
महिलांच्या संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करा
तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com