प्रभारी कुलसचिवांंच्या विरोधात विद्यापीठ कर्मचारी कृती समितीची कुलगुरुंकडे तक्रार

प्रभारी कुलसचिवांंच्या विरोधात विद्यापीठ कर्मचारी कृती समितीची कुलगुरुंकडे तक्रार

जळगाव । प्रतिनिधी Jalgoan

कवयित्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या सेवा पुस्तिकेची गोपनीय माहिती संबंधित कर्मचार्‍यांची पूर्व परवानगी न घेता प्र कुलगुरु डॉक्टर एस.आर.भादलीकर यांनी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथील प्रशासन अधिकार्‍यांना पाठविली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कृती समितीने विद्यापीठात सोमवारी द्वारसभा घेवून प्रभारी कुलसचिवांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच प्रभारी कुलगुरु ई वायुनंदन यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

विद्यापीठातील कर्मचार्‍यांची गोपनीय माहिती आवश्यक नसतांना व लेखी स्वरुपात कुठलीही मागणी नसतांना प्र कुलगुरु डॉ. भादलीकर यांनी शिक्षण संचालक कार्यालय पुणे प्रशासन अधिकारी सुयश दुसाने यांना पाठविली आहे.

भविष्यात या माहितीचा दुरूपयोग होवू शकतो. त्यामुळे कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव भैयासाहेब पाटील, दुर्योधन साळुंखे, संजय सपकाळे, महेश पाटील, राजू सोनवणे, विकास बिर्‍हाडे, शिवाजी पाटील, यांच्यासह कर्मचारी द्वारसभेत उपस्थित होते. यावेळी कृती समितीतर्फे प्रभारी कुलसचिव डॉ. भादलीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच याबाबत प्रभारी कुलगुरु ई वायुनंदन यांच्याकडे तक्रार केली असल्याचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी कृती समितीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

शासनाच्या आदेशाची पायमल्ली

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये 50 टक्के उपस्थितीची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र 14 जुलै पासून 100 टक्के उपस्थिती द्यावी असे आदेश विद्यापीठाचे वित्त व लेखाअधिकारी काढले आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com