डॉ. निलेश किनगेंविरोधात आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार

बिलांच्या पैशांसाठी सहा महिन्यांपासून फिरवाफिरव

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील अ‍ॅक्सॉन ब्रेन हॉस्पिटलचे संचालक डॉ. निलेश किनगे यांना अतिरीक्त घेतलेले अडीच लाख रुपये परत करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी दिले होते. परंतु आदेश होवून सहा महिने झाले तरी डॉ. किनगेंकडून पैशांसाठी फिरवाफिर करीत पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार दीपक छगन कावळे यांनी जिल्हाधिकार्‍यांसह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

तक्रारदार दिपक छगन कावळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, त्यांची आई 10 सप्टेंबर 2020 रोजी अँक्सान ब्रेन हॉस्पीटल येथे दाखल होत्या. डॉ. निलेश किनगे यांनी त्या पॉझिटीव्ह असल्याचे तोंडी सांगत आपण टेस्ट करू असे सांगितले.

दरम्यान सुमारे हॉस्पिटलमध्ये 26 दिवस उपचार घेतल्यानंतर शासनाच्या नियमानुसार सुमारे दीड लाखापर्यंत बिल येणे अपेक्षीत होते. याबाबत दीपक कावळे यांनी डॉ. निलेश किनगेंसह मेडिकल व्यवस्थापक गजानन पाटील यांच्याकडे आपण शासन नियमानुसार बिलाचे पैसे घेण्याबाबत विनंती केली.

मात्र गजानन पाटील यांनी पैसे देत असाल तर ठीक आहे नाही तर आताच्या आता व्हेंटिलेटर काढतो व तुमचे पेशंट कंपाउंडमध्ये आणून ठेवतो. मग ते मरो कि काहीही हो अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

डॉ. किनगे यांनी उपचाराच्या बिलाचे सुमारे 4 लाख 60 हजार इतके बील काढले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. यावर सुनावणी होवून 2 लाख 44 हजार रूपये परत करण्याचे आदेश उपलब्ध असलेल्या औषधी बीलांच्या आधारे करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

सहा महिन्यांपासून पैशांसाठी फिरवाफिरव

जिल्हाधिकार्‍यांनी तक्रार निकाली काढल्यानंतर जिल्हा शल्यचिकीत्सकांनी तक्रारदारास अतिरीक्त वसुल केलेली 2 लाख 40 हजारांची रक्कम परत करण्याच आदेश 3 डिसेंबर 2020 रोजी काढले होते. आदेश काढून सहा महिन्यांचा कालावधी ओलांडला. मात्र डॉ. किनगेंकडून दिशाभूल केली जात असून तू फेर्‍या मारू नको तू कोणाकडेही गेला तरी तुला ते पैसे आता मिळणार नाही अशी धमकी दिली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सेटलमेंट कर नाही तर एक रुपयाही नाही मिळणार

पैशांसाठी तक्रारदार डॉ. किनगें यांच्यासह गजानन पाटील यांच्याकडे जात असल्याने त्यांच्याकडून तू सेटलमेंट करून घे नाही तर एक रूपया ही तूला मिळणार नाही. असे म्हणत तक्रारदाराची मानसिक छळ केला जात आहे.

तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी डॉ. निलेश किनगे व गजानन पाटील यांच्या विरूद्ध फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी अशी मागणी आरोग्यमंत्री टोपे, जिल्हाधिकारी राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे, महापौर ज्योती महाजन यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबतची तक्रार रामानंद नगर पोलिसात दाखल केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com