रावेर|प्रतिनिधी- Raver

विवरे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ४ प्रभागातील लढती उत्कंठा आणि चुरस निर्माण करणाऱ्या असल्याने यात बाजी कोण मारेल याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

२ माजी सरपंच,७ माजी सदस्य यांच्यासह ३२ उमेदवार रिंगणात आहे.माजी सरपंचाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला माघारीसाठी ३ लाखाची ऑफर मिळाली होती,मात्र हि ऑफर उमेदवाराने नाकारल्याने आता निवडणुकीत आणखीच रंगत भरली आहे.

प्रभाग १ मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात माजी सरपंच संजय महाजन,सुनील पाटील,ज्ञानेश्वर पाटील,योगेश चौधरी,शिवराम महाजन,अशरफ शेख यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.याच प्रभागात जनरल महिला या प्रवर्गात मंगला बखाल विरुद्ध कामिनी चौधरी यांच्यात सरळ लढत आहे.सर्वसाधारण महिला यात आशा पाटील,छाया गायकवाड,वंदना चौधरी यांच्यात तिरंगी लढतीचे आव्हान आहे.प्रभाग २ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या ठिकाणी माजी सदस्य सुभाष पाटील विरुद्ध जीवन बोरणारे,जनरल गटात भागवत सावळे,बाबुराव पाटील,अर्जुन लोखंडे यांच्यात लढत रंगणार आहे.

महिला राखीव गटात इंदूबाई लोखंडे,माधुरी पाटील,नम्रता पाटील या तिघांमध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. प्रभाग ३ मध्ये संदीप पाटील विरुद्ध चंद्रकांत पाटील या लढतीकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे,एकास एक लढत असल्याने मोठी चुरस आहे.यात कोणाला संधी मिळते यावर पुढील दिशा ठरणारी आहे.याच प्रभागात माजी सरपंच कविता पाटील यांना मथुरा पाटील यांचे तगडे अव्हान आहे.प्रभाग-४ मध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात दीपक गाढे,भास्कर गाढे,सुमन बोरणारे यांच्यात तिरंगी लढत आहे,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव मध्ये स्वरा पाटील यांना मंगला पाटील,नफिसा बी पिंजारी,यांच्यात सरळ लढती आहे.

सर्वसाधारण महिला गटात सरोज परदेशी,जलानुरबी खान,नसीम बी शरीफ यांच्यात लढत आहे.राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वकांक्षी असलेल्या गावाची निवडणूक यंदा गाजणार आहे.यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.माजी सरपंच कविता पाटील,संजय महाजन पुन्हा रिंगणात आहे.तर माजी सदस्य सुभाष पाटील,अर्जुन लोखंडे,योगेश चौधरी,अशरफ शेख,चंद्रकांत पाटील,सुमन बोरनारे,दीपक गाढे देखील उमेदवार आहे.

चिठ्ठी टाकण्याचा फंडा फोल

गावातील एका उमेदवाराच्या भावाने माघारीच्या दिवशी निवडणुकीच्या कलाचा अंदाज घेत चिठ्या टाकून सदस्य निवडण्याचा फंडा आणला होता.मात्र इच्छुक उमेदवारांनी थेट नकार दिल्याने आता काही प्रभागात दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढतीचे अव्हान आहे.दरम्यान एका माजी सरपंचाने प्रतिस्पर्धी उमेदवाराला माघारीसाठी ३ लाख रुपयांची ऑफर दिली होती,मात्र उमेदवार महिलेच्या मुलाने सपशेल नकार दिल्याने पैशांच्या जोरावर बिनविरोध होण्याचे स्वप्न भंगले आहे.