रेमडेसीवीरच्या विक्रीत मिळायचे 3 हजारांचे कमिशन

फरार मुख्य सूत्रधार डॉक्टर पोलिसांना गवसेना ?
रेमडेसीवीरच्या विक्रीत मिळायचे 3 हजारांचे कमिशन

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातून ठिकठिकाणी काळ्या बाजारात रेमडेसीवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणार्‍या रॅकेटचा पोलीस दलाने पर्दाफाश केला.

या रॅकेटने केवळ जळगाव शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात रेमडीव्हीरचा इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे.

रेमडेसीवीरची व्रिकी करणार्‍या टोळीतील प्रत्येकाला एका इजेंक्शनच्या मागे 1500 ते 3 हजार रुपये मिळत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

दरम्यान यातील मुख्य संशयित शहरातील एका रुग्णालयाचा डॉ. तौसिफ शेख हा मुख्य सूत्रधार असून त्यानेच टोळील मोठ्या प्रमाणावर रेमडेसीवीर इजेंक्शन पुरविेले आहे.

तो सद्यस्थितीत फरार असून त्याचाही पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे.

रेमडेसीवीरची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करणार्‍यांवर पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने 22 एप्रिल रोजी शहरात विविध ठिकाणी छापेमारी केली होती.

या स्वातंत्रय चौकासह शहरातील विविध भागातून रेमडीसीव्हीरची चढ्या दराने व्रिकी करणार्‍या शेख समीर शेख सगीर (वय 23) रा.शिवाजीनगर याला ताब्यात घेतले.

त्याची विचारपुस केली असता त्याने नवल लालचंद कुंभार (वय-25) रा.खंडेरावनगर, सुनील मधुकर अहिरे (वय-32), रा.हरिविठ्ठलनगर), झुल्फीकार अली निसार अली सैय्यद (वय-21) रा.इस्लामपुरा, धानोरा.ता.चोपडा, मुसेफ शेख कय्युम (वय-28) रा.मास्टर कॉलनी, डॉ.आले मोहम्मद खान, सैय्यद आसीफ इसा (वय-22) रा.सुप्रीम कॉलनी, अझीम शहा दिलावर शहा (वय-20) रा.सालार नगर, जुनेद शहा जाकीर शहा (वय-23 ) रा.सालारनगर या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक झालेल्यांकडून नेमके इंजेक्शन कसे उपलब्ध झाले.

याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. संशयितांकडून या प्रश्नावर मात्र चुप्पी साधली जात आहे. संशयितांव्यतिरीक्त अनेक बडे वैद्यकिय व्यावसायिक यात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

रॅकेटने मोठ्याप्रमाणावर विकले इंजेक्शन

पथकाने संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 7 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले होते. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा, भुसावळ यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी या टोळीमार्फत इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात एकीकडे एक रेमडेसीवीर इजेक्शनही मिळत नसतांना दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमााणवर इंजेक्शन संशयितांकडे आलेच कसे ?

डॉक्टरच यात सक्रीय असल्याने रुग्णांच्या नावे इंजेक्शन मागवून रुग्णांना न देता ते काळ्याबाजारात विक्री केली का ? किंवा डॉक्टरकडे मोठ्या प्रमाणावर इंजेक्शनचा साठा होता का ?

यात आणखी कुण्या मो÷ठ्या व्यक्तीचा तर सहभाग नाही ना ?

या प्रश्नांची उत्तरे सद्यस्थितीत अनुत्तरीत असून मुख्य सूत्रधार डॉ. तौसिफ शेख याला अटक केल्यानंतर या सर्व प्रश्नांचा उलगडा होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com