दिलासादायक : जळगाव जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर

चार तालुक्यात प्रत्येकी एक अ‍ॅक्टीव्ह रुग्ण; सव्वातीन महिन्यांपासून एकही रुग्णाचा मृत्यू नाही
दिलासादायक : जळगाव जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्यात कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेने हाहाकार माजविला होता. सर्वच रुग्णांलयांसह विलगीकरण कक्ष फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवर (Health systems) प्रचंड ताण आला होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत घट(Decrease) होत आहे. यातच सव्वातीन महिन्यांपासून जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नसून (victim is not dead) जिल्ह्यात केवळ 4 तालुक्यात प्रत्येकी एक अ‍ॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याने जिल्ह्याची वाटचाल ही कोरोनामुक्तीकडे (Towards corona liberation) सुरु असल्याने ही बाब जळगावकरांसाठी दिलासा(Comfortable) देणारी ठरत आहे.

गेल्या दीड वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातले असून संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेल लहान मुलांसह वृद्धांना अधिक धोका होता. मात्र दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधीक तीव्र असल्याने सर्व वयोगटातील त्याचा त्रास झाला. तसेच दुसर्‍या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांलयांसह कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी बेडच शिल्लक नसल्याची गंभीर स्थिती ओढावली होती.

तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी देखील दोन दिवस दिवस नंबर लागत नसल्याचे भयंकर चित्र कोरोनाकाळात बघावयास मिळाले. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यात पंधरा तालुक्यांपैकी केवळ चार तालुक्यात प्रत्येकी एक म्हणजेच चार रुग्ण उपचार घेत असल्याने ही जळगावकरांसाठी समाधनाची बाब मानली जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत कोरोनामुळे अनेकांचे आधार तर अनेकांचे कुटुंब उद्धवस्थ झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 575 जणांनी कोरानामुळे आपला जीव गमवाला आहे. मात्र बाधितांच्या संख्ये घट झाल्यानंतर कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूला देखील बे्रक लागला आहे.

14 जून रोजी कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याने 103 दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे एकही बाधिताने आपला जीव गमावला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

कोरोनाला अटकाव घालणे शक्य

जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून दुसर्‍या लाटेत प्रभावी उपायोजना करण्यात आल्या. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाला यश मिळाले आहे. यामध्ये ज्यावेळी जिल्ह्यात आयसीयू, व्हेंटीलेटरचा एकही बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट होत होती. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी बेड नियंत्रण कक्षाची स्थापना करीत त्यावर तोडगा काढला होता. त्यामुळे जिल्ह्यातील संपुर्ण रुग्णालयांसह कोविड सेंटरमधील बेडची इत्तंभूत माहिती प्रशासनाकडे असल्याने नागरिकांना रुग्णांवर उपचारासाठी चांगलीच मदत झाली.

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढताच जिल्ह्यात कोरोनाकाळात अ‍ॅन्टीजन व रॅपीड चाचणी करुन कोरोनाचे निदान केले जात होते. यामध्ये दिड वर्षात 5 लाख 46 हजार 979 रुग्णांनी आरटीपीसीआर तर 10 लाख 12 हजार 465 जणांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये आतापर्यंत 1 लाख 42 हजार 735 जण बाधित आढळून आले असून 1 लाख 42 हजार 735 जणांनी कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी दर हा 98.18 इतका झाला आहे.

काळजी न घेतल्यास धोका कायम

जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र नागरिकांकडून मास्क न वापरणे, गर्दी करणे आदी केले जात असल्याने प्रशासनाकडून तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जो पर्यंत सर्वांचे लसीकरण पुर्ण होत नाही तो पर्यंत कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी न घेतल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Related Stories

No stories found.