आता...अंत्यसंस्कारासाठी जागा अधिग्रहित करण्याची आली वेळ !

एमआयडीसीत स्मशानभूमिसाठी जिल्हाधिकार्‍यांनी दिली मंजुरी
आता...अंत्यसंस्कारासाठी जागा अधिग्रहित करण्याची आली वेळ !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाबाधितांच्या मृत्यू होणार्‍यांची संख्या ही जिल्ह्यात 24 वर येवून पोहचला आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नसल्याने मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना तासनतास ताळकटत बसावे लागत असल्याने करोनाबाधिताच्या मृतदेहावर अंत्यसंकारासाठी जिल्हाधिकार्‍यांनी एमआयडीसी मधील के सेक्टरमधील खूली जागा अंत्यसंस्कारासाठी अधिग्रहीत करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी आतातरी सावध राहून नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने त्यांना तासनतास मृतदेह घेवून ताळकटत बसावे लागत आहे.

त्यामुळे करोनामूळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरातील नेरी नाका येथील स्माशनभूमी मनपामार्फत आरक्षित करण्यात आली आहे.

याठिकाणी सध्या 24 ओटे आणि गॅसदाहिनी सुरु असून याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. परंतु याठिकाणी जागाच शिल्लक नसल्याने एमआयडीसी परिसरातील के सेक्टरमधील खूली जागा स्मशानभूमी उभारण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहे.

अधिग्रहीत केलेल्या एमआयडीसीतील स्मशानभूमीच्या जागेवर कोरोना बाधित किंवा संशयित रुग्णांच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने येथे मनपा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी मनपाला दिले आहे.

शक्य झाल्यास गॅसदाहिनी तयार करा

मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ही जागा स्मशानभूमी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच या ठिकाणी आवश्यकतेनुसार ओटे तयार करणे आणि शक्य झाल्यास गॅसदाहिनी तयार करण्यात यावी असे आदेश दिले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com