महापुरुषांच्या स्मारकाची दररोज स्वच्छता करा

अमळनेर मुख्याधिकाऱ्यांकडे समता समितीची मागणी
महापुरुषांच्या स्मारकाची दररोज स्वच्छता करा

अमळनेर - प्रतिनिधी Amalner

शहरात सर्व महापुरुषांचे स्मारक बनवून अमळनेर नगर परिषदेने सर्व समूह घटकांना समान न्याय दिला आहे. हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम अमळनेर शहरातच झाले असेल. मात्र सध्या या स्मारकांची खूप मोठी दयनीय अवस्था झाली आहे. अनेक स्मारक शहरात धूळ खात बसली आहेत. त्यांच्या आजू बाजूला स्वच्छता नाही. व स्मारकांची देखील स्वच्छता नाहीये. यामुळे या महापुरुषांचा अपमान होत आहे.

संबंधित समूह / घटक देखील ही नप प्रशासनाची जबाबदारी असल्याचे समजत यावरून हात काढून घेण्याचा प्रयत्न करीत असते. आणि ही नप प्रशासनाची देखील मोठी जबाबदारी असल्याने कृपया या कडे लक्षं देऊन या स्मारकांची लवकरात-लवकर स्वच्छता करावी जेणे करून या महापुरुषांचा अपमान थांबेल. असे विनंती पर निवेदन आज नूतन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या कडे समता समिती मार्फत देण्यात आले आहे. यावेळी माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील, समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे व सचिव सुरेश कांबळे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com