शहरातील रस्त्यांनी पंधरवड्यानंतर घेतला मोकळा श्वास
जळगाव

शहरातील रस्त्यांनी पंधरवड्यानंतर घेतला मोकळा श्वास

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील फुले मार्केट, टॉवर चौक, गोलाणी मार्केटसह दाणा बाजार, सुभाष चौक असे सर्वच मार्ग वाहतुकीस खुले करण्यात आले असून काल सायंकाळी उशीरापयर्र्त रस्त्यांवरील पत्रे काढण्याचे काम मनपातर्फे सुरू होते.

सोमवार 27 पासून नो व्हेईकल झोन नसणार असे प्रशासनाने आधीच जाहीर केेले असल्याने मनपातर्फे तसेच प्रशासनातर्फे रस्त्यांवरील पत्रे काढण्याचे काम शनिवार सायंकाळपासून सुरू होते. रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांसह दुकानदार, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना होणारा त्रास कमी झाला असून वाहनधारकांनाही आपले वाहन मोकळेपणाने आपल्या इच्छित स्थळी नेता येणार आहे तसेच नागरिकांनाही मुक्तपणे शहरात संचार करता येणार आहे. शिवाय नागरी जीवन पूर्वपदावर येण्यासही सुरुवात होणार आहे.

गेल्या 14 जुलै रोजी जिल्हाधिकार्‍यांनी नो व्हेईकल झोनचे धोरण ठरवले होते. यामुळे मात्र वाहनांसह नागरिकांचीही कोंडी होत होती. दि.27 सोमवार पासून म्हणजे तब्बल 15 दिवसानंतर नो व्हेईकल झोन रद्द होणार आहे. यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. पत्रे लावल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. विशेषत: टॉवर चौक, घाणेकर चौक, जुना कापड बाजार परिसर, चित्रा चौक, बळीराम पेठ या भागात अधिक वाहतुकीची कोंडी होत होती.

Deshdoot
www.deshdoot.com