जळगाव शहरातील रस्ते दुरुस्तीचा श्रीगणेशा

आठवडाभरात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये खडी, डांबर टाकून मलमपट्टी
जळगाव शहरातील रस्ते दुरुस्तीचा श्रीगणेशा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील मुख्य रस्त्यांसह (roads) गल्ली बोळातील प्रत्येक रस्त्यावर मोठमोठे खड्डे(Huge pits) पडले आहे. त्यामुळे पादचार्‍यांसह वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मनपासह महापौरांकडे (mayor) प्रचंड तक्रारी (Complaints) प्राप्त होत अल्याने मनपाकडून शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये डांबर व खडी टाकून त्याची डागडूजीस (Dag dujis) सुरुवात करण्यात आली आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध उपनगरांतील तसेच कॉलन्यांतील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यात पावसाळा असल्याने पादचार्‍यांसह वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपासह, महापौर, उपमहापौरांकडे प्रचंड तक्रारी येत होत्या. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याला प्राधान्य देण्यात यावे.

यासाठी महापौर जयश्री महाजन, उपमहपौर कुलभूषण पाटील यांनी मनपाच्या अधिकार्‍यांकडे बैठका घेतल्या. यात मनपाने शहरातील किमान मुख्य रस्त्यांवरील त्यात डांबरी व काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा विषय गंभीरतेने घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेस आठवडाभरापासून सुरूवात केली.

यात सातत्याने मक्तेदारांकडून केल्या जाणार्‍या कामांसंदर्भातील नागरिकांची ओरड लक्षात घेऊन संबंधित रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने स्वतःचीच संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरविली आहे.

याठिकाणावरील रस्त्यांची झाली दुरुस्ती

महापालिका प्रशासनातर्फे आठवडाभरापासून शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम शाखा अभियंता चंद्रशेखर सोनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यामध्ये काही दिवसांत नेहरू पुतळा परिसर ते रेल्वे स्थानक, तसेच विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले गेले. 11 रोजी स्वातंत्र्य चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालय, आकाशवाणी चौक परिसरातील रस्त्यावरील खड्डे अभियंता योगेश वाणी यांच्याकडील जबाबदारीतून बुजविण्यात आले.

महापौर, उपमहापौरांकडून कामाची पाहणी

स्त्यांवरील खड्ड्यांचे काम सुरु असून त्या कामांची पाहणी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडून नियमित पाहणी केली जात आहे. सुरूवातीला शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संपल्यानंतर पावसाळा संपताच इतर रस्त्यांच्या कामांनाही सुरूवात होणार असून त्यासाठी देखील शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com