महापालिकेतील शाहू रुग्णालयात लसीकरणावरुन नागरिकांचा गोंधळ

रांगेत उभे असतांना परस्पर दुसर्‍याला लसी दिल्याचा आरोप
महापालिकेतील शाहू रुग्णालयात लसीकरणावरुन नागरिकांचा गोंधळ

जळगाव - शहरातील महापालिकेल्या शाहू महाराज रुग्णालय हे लसीकरण केंद्र आहे. याठिकाणी आज बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास लसीकरणावरुन नागरिकांनी येथील कर्मचार्‍यांशी वाद करत गोंधळ घातल्याची घटना घडली. रांगेत उभे असतांना दुसर्‍याच कुणालातरी लसी दिल्याचा आरोप नागरिकांनी बोलतांना केले आहे. तर येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णालयात १०० लसी मिळणार्‍या होत्या. त्या सर्वच्या सर्व लसी नागरिकांनाच दिल्याचा खुलासा केला आहे.

शहरातील रिंगरोडवरी महापालिकेच्या शाहू रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यानुसार आज नेहमीप्रमाणे याठिकाणी ज्येष्ठ नागरिक पोहचले तसेच ४५ वर्षावरील व्यक्ती आले. याठिकाणी नागरिक लसीकरणाच्या प्रतिक्षेत थांबले असतांना, ऐनवेळी नागरिकांना लसी संपल्या असल्याचे सांगून दुसर्‍या दिवशी येण्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी किती लसी आल्या होत्या असे पारिचारिकांना विचारले असता, १०० लसींची माहिती त्यांच्याकडून नागरिकांना देण्यात आली. येथील नागरिकांना मात्र प्रत्यक्षात २५ नागरिकांनाच लस दिल्याचे सांगत उर्वरीत ७५ लस गेल्या कुठे असा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच रांगेत उभ्या नागरिकांना लसी न देता इतर कुणालाच लसी दिल्याचा आरोप करत नागरिकांनी गोंधळ घातला. नागरिकांचा गोंधळ वाढल्याने येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करत नागरिकांना बाहेर काढले. यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांना नागरिक भेटले, १०० च लसी असल्याने त्या सर्वांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच लसी उपलब्ध झाल्यावर उद्या किंवा परवा लसीकरण केले जाईल असे सांगत वैद्यकीय अधिकार्‍यांकडून नागरिकांची समजूत काढण्यात आली.

कोट

आम्ही आमची तक्रार करण्यासाठी गेलो असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच आम्ही लसीकरण बंद करावयाचे असे सांगण्यात येवून आम्हाला बाहेर काढून देण्यात आले. - विकास येवले, नागरिक

कोट

लस आम्हाला सव्वा १० वाजता मिळाली. त्यावेळी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. १०० लस आम्हाला उपलब्ध होती. त्यानुसार आम्ही रांगेत उभ्या १०० लोकांना लस दिली. मात्र काही जण उशीरा आले असतील, लस संपल्याने त्यांना लस मिळाली नसेल, असे सांगून नागरिकांना समजावून सांगितले. त्यांना उद्या किंवा परवा लस देण्यात येईल असे सांगितले. आम्हाला सर्वांना लस द्यायचीच आहे. जशा लसी उपलब्ध होती त्यापध्दतीने त्या दिल्या जातील. - डॉ. राम रावलानी,वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com