चोपडा - Chopda - प्रतिनिधी :

चारित्र्याच्या संशयावरून चौघांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची खडबळजनक घटना दि.4 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजता लासुर (ता.चोपडा) येथे घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा तालुक्यातील लासुर येथील रहिवासी रतिलाल जगन्नाथ माळी (वय-32) हा घरात घुसला म्हणून त्याच्या चारित्र्यावर संशय घेत गावातील मंगेश नवल महाजन, विकास नवल महाजन, भुषण कैलास मगरे, दादु राजेंद्र साळुंखे (सर्व रा.लासुर) अशा चौघांनी त्याच्या घरात जाऊन लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याने त्यात गंभीर जखमी झाल्याने रतिलाल जगन्नाथ माळी याचा मृत्यू झाल्याची घटना दि.4 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजता लासुर येथे घडली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागाचे डीवायएसपी राजेंद्र रायसिंग व ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक यांनी रात्रीच लासुर येथील घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनला मृताचा भाऊ प्रदीप उर्फ आबा जगनाथ माळी (वय-28, रा. लासुर) याच्या फिर्यादीवरून मंगेश नवल महाजन, विकास नवल महाजन, भुषण कैलास मगरे, दादु राजेंद्र साळुंखे यांच्या विरुद्ध गुरनं. 04/2021 भादवि कलम-302, 452, 323, 504, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर मृताचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी तायडे यांनी केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आराक करीत आहेत.