मयुरेश्वर स्कूलमधील चिमुकले बनले सांता क्लॉज
जळगाव

मयुरेश्वर स्कूलमधील चिमुकले बनले सांता क्लॉज

Balvant Gaikwad

रायपूर, ता. जळगाव (वार्ताहर)

येथील मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम प्ले स्कूलमध्ये नाताळसणानिमित्त मेरी ख्रिसमस हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात चिमुकल्या विद्यार्थी सांता क्लॉज बनले होते.

सांता क्लॉज यांच्या  वेशभूषेत  पुष्कर शेळके. (नर्सरी), आदित्य पाटील (ज्युनी. के.जी.) गीतांशु सुतार.(सिनी. के.जी.) तसेच सुंदर परीच्या वेशभूषेत गुंजन पाटील (सिनी.के.जी.), आराध्या पाटील (सिनी. के.जी.) यांनी उत्कृष्ट वेशभूषा साकारली. खिसमस केक कापून तसेच सुंदर धमाल डान्स सादर करण्यात आला.

सर्व उपस्थित चिमुकल्या विध्यार्थ्यांना सांताक्लॉज़च्या हस्ते केक व चॉकलेट वाटप करुन नाताळ उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com