खदानीत बुडून बालकाचा मृत्यू
जळगाव

खदानीत बुडून बालकाचा मृत्यू

नशिराबाद शिवारातील घटना

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

बकर्‍या चारणारा १४ वर्षीय बालक नशिराबाद शिवारातील विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यालगतच्या खदानीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाला. पवन भिकन पाटील (वय १४, रा.पेठ भाग, नशिराबाद) हा बालक बकर्‍या चारण्यासाठी जंगलात गेला होता. तो पोहण्यासाठी गेला असतात त्यास पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो जास्त पाण्यात शिरला आणि त्याचा मृत्यू झाला. याबाबत त्याचे वडील भिकन शंकर पाटील (वय २८) यांनी खबर दिली. त्यावरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तपास हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख करीत आहेत.पाळधीतील तरुणाचा मृतदेह आढळलाधरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील रहिवासी आणि जैन इरिगेशनमधील कर्मचारी मुकेश ईश्‍वर मोरे (वय २८) हा तरुण आणि त्याचे कुटुंबीय व मित्र तसेच मित्राचेही कुटुंबीय कांताई बंधारा परिसरात ३० रोजी फिरायला गेले होते. मुकेश पोहण्यासाठी बंधार्‍यातील पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो जास्त पाण्यात शिरला. त्यानंतर पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे हा तरुण पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आव्हाणे परिसरातील गिरणा नदीच्या पात्रात आढळला. याबाबत किशोर धुडकू मोरे (पाळधी खुर्द) यांनी खबर दिली. त्यावरुन पाळधी दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास नाईक उमेश भालेराव करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com