झाडाची फांदी अंगावर पडून बालकाचा मृत्यू

पिंपरखेड येथील घटना
झाडाची फांदी अंगावर पडून बालकाचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपरखेड येथे शेतात खेळत असतांना वादळामुळे झाडाची फांदी तुटून अंगावर पडल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ओम ईश्वर सांळुखे असे मयत बालकाचे नाव असून हि घटना सोमवारी घडली आहे.

पिंपरखेड शिवारात मृत बालकाचे वडील ईश्वर सांळुखे यांची शेती आहे. सोमवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वार्‍यास सुरूवात झाली. त्यामुळे साळुंखे यांच्या पत्नी, ओम व त्याची लहान बहीण हे कांदा झाकण्यासाठी धावपळ करत शेतात गेले होते. शेतात ओमची आई व बहीण कांदा झाकत होत्या. तर ओम हा तेथेच शेतातील आंब्याच्या झाडाखाली खेळत होता. वादळामुळे झाडाची फांदी तुटून अचानक ओमच्या अंगावर पडली. त्याखाली दाबला गेल्याने ओम गंभीर जखमी झाला.

या घटनेनंतर त्याच्या आईने ओमला शेतातून उचलून गावात आणले. जखमी बालकाला चाळीसगाव शहरात उपचारासाठी खासगी रूग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अमोल मोरे यांनी तलाठी व अधिकार्‍यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्यासोबत मदतीबाबत सूचना दिल्या. या घटनेचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला आहे. ओम हा घरातील एकच मुलगा होता, एकुलत्या एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com