बोरी नदीपात्रात सोडले केमिकल

बोगस डिझेलची असल्याची चर्चा
बोरी नदीपात्रात सोडले केमिकल

पारोळा - Parola

तालुक्यातील बहादरपूर येथील बोरी नदी (Bori river) पात्रात आज सकाळी मुले आंघोळीला गेले असता त्यांच्या अंगाला केमिकल लटकले आणि सदर मुलांनी (Sarpanch) सरपंच बापू सैंदाणे यांना सांगितले असता त्यांनी बहादरपूर (Talthi) तलाठी पी पी शिंदे यांना बोलावून सदर बाब लक्षात आणून दिली.

बोरी नदीपात्रात सकाळी अक्षरश: केमिकलयुक्त पाणी वाहत होते सकाळी मुले आंघोळीला गेले असता त्यांच्या अंगाला पूर्ण केमिकल लटकलं अंग खाजवू लागलं नेमकं हे केमिकल कोणत्या दुष्कुत्यातून सोडण्यात आलं याचा छडा लावण्याचे काम सध्या सुरू आहे अज्ञातांनी सोडलेले हे रसायन मुक्या प्राण्यांना तसेच नागरिक यांनादेखील धोक्याचे असल्याचे यावेळी निदर्शनास आले नेमकं हे केमिकल आहे की नॅशनल हायवे क्रमांक 6 वर विकले जाणारे बोगस डिझेल आहे अशी चर्चा सध्या गावात जोरदार सुरू आहे मात्र सकाळपासून गावात एकच विषय चर्चेचा ठरला तो म्हणजे बोरी नदीपात्रात आलेल्या केमिकलचा या प्रसंगावधान साधून शिरसोदेचे सरपंच बापू सैंदाणे यांनी बहादरपूर सजाचे तलाठी प्रवीण शिंदे यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून बोरी नदीपात्रात बोलावले त्यांनी पाहिले की बोरी नदी पात्रात केमिकलयुक्त पाणी वाहत आहे त्यांनी तहसीलदार अनिल गवांदे यांना सांगितले सदर बाबतीत सखोल चौकशी होऊन दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे. मुक्या प्राण्यांना देखील या केमिकल मुळे धोका होऊ शकतो म्हणून या आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून अज्ञाताचा शोध लाऊन त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

केमिकल नाही बोगस बायोडिझेल

बोरी नदीपात्रात सदर रसायन केमिकल नसुन नॅशनल हायवे क्रमांक 6 वर विकले जाणारे बोगस बायोडिझेल आहे बोगस बायोडिझेलची कारवाई पहाता त्यात त्यांनी रात्री हा प्रकार केला, टँकरद्वारे बोगस बायोडिझेलची विक्री हॉटेल वर होत होती त्यांनी रात्री बोगस डिझेल नदीपात्रात सोडले असावे असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला हे रसायन नसून बायोडिझेल आहे असा ग्रामस्थांचा ठाम विश्वास आहे नेमके हे बायोडिझेल विकणारी टोळी कोणती आणि यांचा मोरक्या कोण याचा योग्य छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com