नोकरीचे आमिषाने विवाहितेची फसवणूक

तब्बल महिनाभरानंतर रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
नोकरीचे आमिषाने विवाहितेची फसवणूक
Fraud (फसवणुक)

जळगाव - Jalgaon

एअरटेल कंपनीत (Airtel Company) जॉब लावून देण्याचे आमिष दाखवत जळगाव शहरातील संभाजी नगरातील विवाहितेची अवघ्या दोन दिवसात सुमारे २ लाख ४२ हजार ६५० रूपयांची फसवणूक झाल्याची घटना ३ जुलै त ५ जुलै २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर काल मंगळवारी रात्री ९.३० वाजता विवाहितेची तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस (Ramanand Nagar Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री राजेंद्र सोनवणे (वय-२३) रा. विवेक कॉलनी, संभाजी नगर, ह्या १ वर्षाच्या मुलीसह राहतात. २७ जुन २०२१ रोजी त्यांच्या मोबाईवर एअरटेल जॉब संदर्भात मॅसेज आला. यात जॉबसाठी दिलेल्या वेबसाईटवर कागदपत्रे अपलोड करण्याचे सांगितले. त्यानुसार जयश्री सोनवणे यांनी शैक्षणिक कागदपत्रे अपलोड केले. त्यानंतर २८ जुन रोजी त्यांचे सिलेक्शन झाल्याचे पुन्हा एक मॅसेज आला. समोरील व्यक्ती अमीत अग्रवाल बोलत असल्याचे सांगून तुम्हाला रजिस्ट्रेशन फि भरावी लागेल असे सांगितल्यावर जयश्री सोनवणे यांनी ३ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता फोन पे द्वारे १ हजार ८५० रूपये दिलेल्या क्रमांकावर ऑनलाईन ट्रान्सफर केले.

विविध कारणांनी पैसे मागवून गंडविले

दुसर्‍या दिवशी अमित अग्रवाल यांनी ड्रेस व मोबाईल , एंप्लायमेंट कार्ड, लॅपटॉप, एसएमएस बुक, प्रिंटर, माऊस अश्या वस्तू पाठवून तुम्हाला याच्यावर काम करायचे आहे असे सांगून त्याचा इंन्सूरन्स काढायचे असल्याचे सांगून ८ हजार ६५० रूपये खात्यावर पैसे टाकावे लागतील असे सांगितले. त्यानुसार सोनवणे यांनी पुन्हा ८ हजार ६५० रूपये पाठविले. त्यानंतर अमित अग्रवालने पुन्हा फोन करून विविध कारणे सांगून वेगवेगळे बँक खाते आणि अकाऊंट नंबरवर वेळोवेळी एकुण २ लाख ४२ हजार ४५० रूपये भरावयास सांगितले. मात्र एअरटेल कंपनीत जॉब मिळाला नाही.

माझे पैसे परत करा असे सांगितल्यावर पैसे परत मिळण्यासाठी पुन्हा परत पैसे द्यावे लागतील असे संबंधितांकडुन सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच जयश्री सोनवणे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फोनवरून संपर्क साधून पैसे मागणार्या अमित अग्रवाल नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून मंगळवारी रात्री ९.३० वाजता रामानंद नगरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल रत्ना मराठे करीत आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com