चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावरकर चौकात जुन्या भाडणाच्या कारणावरुन दोन माजी नगरसेवकांमध्ये बाचाबाची होऊन एकाच्या नातेवाईकांने दुसर्याला चाकूने भोकसल्याची घटना दि,८ रोजी संकाळी ११ वाज घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आज तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी आणि माजी नगरसेविका पती जगदिश महाजन यांच्यात शुक्रवारी मागील भांडणाच्या कारणावरुन बाचाबाची झाली, या वादावादीत एकाने प्रभाकर चौधरी यांच्या पोटावर चाकूने वार केले. यावेळी हाकेच्या अंतरावरअसलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच धाव घेवून हल्ला करणार्या तरुणास ताब्यात घेतले. या घटनेत जगदिश महाजन यांचे देखील डोक्याला मार लागल्याने दोघांना रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

प्रभाकर चौधरी यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी शनिवारी संकाळी चाळीसगाव पोलीसांनी औरंगाबाद येथे जावून जखमी प्रभाकर पांडुरंग चौधरी यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यावरुन जगदिश जगन्नाथ महाजन, विशाल उर्फ दादू जगदिश महाजन, संजय घटी पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा.नेताजी चौक चाळीसगाव यांच्याविरोधात भादवी कलम ३०७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस सपोनि.सचिन कापडनिस करीत आहेत.