खंडणी मागणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खंडणी मागणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

एकास अटक : तालुका पोलिसांची कारवाई

भुसावळ Bhusawal ( प्रतिनिधी) -
तालुक्यातील (Sakegaon) येथे आरोपी बंटी पथरोड याच्या वाढदिवसाचे बॅनर फाडल्याच्या (Banner torn) कारणावरुन आरोपींनी एकाचे अपहरण (Kidnapping) करुन २ लाख रुपयांची खंडणी (Ransom) तसेच दहा हजार रुपयांचा हप्ता याप्रमाणे हप्ता वसुल करण्याचे निश्‍चित केल्या प्रकरणी तालुका पोलिसात (taluka police) चौघांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला असून एकास पोलिसांनी ताब्यात घेतल्याची कारवाई करण्यात आली आहे.

तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथिल बंटी पथरोड याच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील साकेगाव येथे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. मात्र अज्ञातांनी संबंधित फलकाची तोडफोड केल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी मयुर मदर काळे (वय १९, रा. साकेगाव) याचे गावतून अपहरण करुन त्याच्या परिवाराकडून ५ लाखांची खंडणी मागीतली त्यानंतर दोन लाखांवर व्यवहार निश्‍चित झाला व उर्वरित रक्कम दहा हजार रुपये हप्त्याने देण्याचे ठरले. यानंतर मयुर याच्या वडिलांनी आरोपींकडे दोन लाख रुपये दिले व मयुर याची सुटका करुन घेतली.
याबाबत तालुका पोलिसात मयुर काळे याच्या फिर्यादीवरुन आरोपी नितिन कोळी, हर्षल पाटील, सागर भोई, बंटी पथरोड ( रा. भुसावळ) या आरोपींविरुद्ध तालुका पोलिसात गु.र.नं. १४८/ २१, भा.दं.वि. ३८०, ३८४, ३६४, ३४१, ३२३फ ५०६, १४३, १४१, १४८, १४९, ३/२५/२७ आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय अमोल पवार करित आहे. या गुन्ह्यात आरोपी सागर भोई यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com