नियमांचे उल्लंघन करीत मोर्चा काढणार्‍या 400 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

आदिवासी भिल्ल समसाजाच्या दफनभूमीच्या सातबारा उतार्‍यावर नावे लावून देण्यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढीत नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह सुमारे 300 ते 400 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकलव्य आदिवासी भिल्ल समाज संघटनेकडून सोमवारी विविध मागण्यांसाठी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढीत करोनाचा संसर्ग असतांना अनावश्यक गर्दी जमविली होती.

एकलव्य आदिवासी भिल्ल समाज संघटनेकडून सोमवारी विविध मागण्यांसाठी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढीत करोनाचा संसर्ग असतांना अनावश्यक गर्दी जमविली होती.

याप्रकरणी मंगळवारी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, सुर्यकांत पवार, कार्याध्यक्ष अनिल सोनवणे, रवी मोरे, अक्षय मालचे, विशाल मोरे, देविदास बहीरम, विजय ठाकरे, राजू सोनवणे, मोतीलाल सोनवणे यांच्यासह सुमारे 300 ते 400 जणांविरुद्ध करोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब साथीचे रोग अधिक 2,3,4 यासह महाराष्अ्र पोलीस अधिनियम 37(1), 37(3), 135 प्रमाणे पोलिस कर्मचारी उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजयकमार सोनार हे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com