भुसावळ - प्रतिनिधी - Bhusawal :

येथील रेल्वे स्थानकाचा एतिहासिक स्थानकांमध्ये समावेश करण्यात येते. स्वतंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य सेनानी चंद्रशेखर आझाद यांची आवडती पिस्टल (मॉवझर) व बॉम्ब बनविण्याची साधने भुसावळ रेल्वे स्थानकावर १९२९ साली पकडण्यात आली होती.

त्यावेळी त्यांचा जीआरपी व ब्रिटीश पोलिसांसोबत घमासान व गोळीबार झाला होता. ही घटना देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातसात सुवर्णाक्षणारांनी लिहिण्यात आली आहे.

ही बाब लक्षात घेता रेल्वे स्थानकांवर करण्यात येणार्या सुशोभनांतर्गत याबाबत सजगता दाखविणारे वर्णण चित्र रेल्वे स्थानकाच्या प्रमुख दर्शनी भागावर आगामी २६ जानेवारी पर्यंत लावण्यात यावे तसेच रेल्वेच्या अनेक घडामोडीत महत्वाचा भाग राहिलेले स्व. माजी खा. हरीभाऊ जावळे यांचे नाव रेल्वे स्थानकावरील पादचारी पुल किंवा रेल्वे संग्राहालयाला देण्यात येण्याची मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्य परिक्षित बर्हाटे यांनी केली आहे.

दि. १८ रोजी रेल्वे सल्लागार समितीच्या १६५ व्या बैठकीत चर्चा करतांना त्यांनी ही मागणगी प्रशासनाकडे केली. ही बैठक करोनाच्या पार्श्व भुमीवर १८ रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात आली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

अध्यक्षस्थानी डिआरएम विवेक कुमार गुप्ता, एडिआरएम प्रबंधक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा, मंडल वाणिज्य प्रबंधक अरुण कुमार, वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हे ऑनलाइन द्वारे बैठकीत उपस्थित होते.

डिआरएम विवेक कुमार गुप्ता यांनी सर्व सदस्यांना संबोधित केले. मंडळ उपभोग कर्ताद्वारे प्रवासी समस्या व सुचनांवर चर्चा करण्यात आली. ज्यामुळे प्रवासी सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार केला जाऊ शकेल.

बैठकीत राहुल गोयंका , विलास नामदेवराव वाडेकर, प्रवीण सावळे, अयुब खान मुस्तफाखान, नितीन मधुकर बोरेकर, राजनारायण मिश्रा, वसंत कुमार बाछुका, जुगलकिशोर कोठारी, दिनेश लक्ष्मण शिंदे, संजय पवार, महेंद्रकुमार बुरड, डॉ.योगेश हेमंतराव सूर्यवंशी, विनायक पाटील, चंद्रकांत कासार, अमोल जाधव, राजेंद्र सोनवणे, वैशाली विजय आरके, पवन भगुरकर, गुरमीत सिंग रावळ, राजेंद्र बाळकृष्ण चाफेकर, पवन लाठ, राम गुलाम सोनी, रवी कुमार मलानी , त्रीलोक पटेल, राजेंद्र जोशी, हरीश कोटवाले आदी सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी केले. आभार मंडल वाणिज्य प्रबंधक बी अरुणकुमार यांनी मानले.