जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

हिवाळा ऋतु सुरू असला तरी यावर्षी जिल्हयात थंडीचे आगमन उशीरानेच झाले आहे. तशात गत महिन्याभरासह आतापर्यत ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तुरळक पाउस देखिल झाला होता.

पुन्हा दोन दिवसांपासून जिल्हात वातावरणातील गारठा कमी झाला असून तापमान कमाल 29 ते किमान 19 अंशावर नोंदवले गेले आहे.

येत्या दोन तीन दिवसांत काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे.

जिल्हयात दोन दिवसांपासून वातावरणातील गारठा कमी झाला असून हवामानात अस्थिरता आहे.

या सप्ताहात तापमान सुंमारे 29 ते 32 अंशापर्यत तर किमान 17 ते 20 अंशा दरम्यान रहाण्याची शक्यता आहे.

त्यात आर्द्रतेच्या प्रमाण देखिल 44टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.

तर आगामी सप्ताहात 14 जानेवारीपर्यत जिल्हयातील विविध भागात ढगाळ वातावरण रहाण्याची अधिक शक्यता आहे.

या ढगाळ वातावरण व हवामानामुळे रब्बी हंगामातील गहू, हरबरा आदि पिकांवर घाटे अळी वा अन्य रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामात अति पावसामुळे हाती आलेले बरेचसा शेतीउत्पादनाचे नुकसान झाले असले तरी रब्बीचे पिक बर्यापैकी येईल या अपेक्षेत असतांनाच आतापर्यत एक दोन वेळा झालेल्या तुरळक पावसामुळे रब्बी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे बाधा उत्पन्न होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.