चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगावकरांच्या आस्मितेचा विषय असलेल्या शिवपुतळा बसविण्यचा मार्ग मोकळा झाला असून शिवपुतळा बसविण्यासाठी बुधवारी चबुतरा व कंपाऊडच्या बांधकामासाठी आखणी करण्यात आली.

यासाठी न.पा.कडून नुकतीच वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्यापासून चबुतराच्या बांधकाम सुरुवात होणार असून लवकरच सिग्नल चौकात भव्यदिव्य शिवपुतळा उभा राहिल्याचे नागरिकांना दिसणार आहे.

शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शिवपुतळा होवा यासाठी अनेक सेना, संघटनानी आदोलन केली. तसेच शहरातील राजकारणही याच मुद्दावर बर्याच दिवस चालले होते. परंतू मागील पाच वर्षाच्या कालावधीत लोकप्रतिनिधीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शिवसृष्टीसह व शिवपुतळ्यास मंजुरी मिळाली आहे.

त्यानुसार गेल्या वर्षभरापासून शिवसृष्टीच्या कामास सुरु असून आता शिवपुतळा बसविण्यासाठी चबुतरा व कंपाऊडच्या बांधकामची आखणी ठेकेदाराकडुन करण्यात आली. न.पा.साठी नुकतीच चबुतरा बांधण्यासाठी वर्क ऑर्डर दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भव्य-दिव्य शिवपुतळा शहरवासियांना पाहवयास मिळणार आहे.