चाळीसगाव : विज अंगावर पडून महिलेचा मृत्यू

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद
चाळीसगाव : विज अंगावर पडून महिलेचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील तळेगाव येथे ठिबकच्या नळ्या जमा करण्यासाठी शेतात गेलेल्या एका महिलेवर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल (दि,२) घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

हिम्मत त्र्यंबक मोरे हे पत्नी व मुलासह तळगोव येथे वास्तव्यास आहेत. मोरे हे शेती व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत. रविवार दिनांक २ मे रोजी दुपारी ठिबकच्या नळ्या जमा करण्यासाठी त्यांची पत्नी वंदना हिम्मत मोरे (वय-४५) व मुलगा (वय-२१) शेतात गेले असता. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक वादळीवार्‍यासह पावसाचे जोरदार आगमन झाले. याच वेळेस अचानक वीज कडाडून वंदना हिम्मत मोरे यांच्यावर कोसळली आणि त्यातच त्याचे दुदैवी मृत्यू झाले. सोबत असलेल्या मुलास सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार शांतीलाल पगारे हे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com