पाणी चोरी होईपर्यंत पालिकेचा पाणी पुरवठा विभाग झोपला होता का ?

पाणी चोरणार्‍यासह न.पा.च्या आधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल करा
पाणी चोरी होईपर्यंत पालिकेचा पाणी पुरवठा विभाग झोपला  होता का ?

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

गिरणा धरणातून थेट चाळीसगांव शहराला पाणी पुरवठा करणारी नगरपालीकेची स्वतंत्र जलवाहीनी आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीच्या दुरुस्ती व देखभालसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. यंदाच्या अर्थसंकल्पात देखील लाखो रुपयांची आर्थिक तरदूत त्यासाठी करण्यात आली आहे.

नुकतेच तालुक्यातील टाकळी प्र. दे. गावालगतच असलेल्या न. पा. च्या जलवाहीचे पाणी तेथून जवळच असलेल्या खासगी पाणी विक्री करणार्या ऍक्वॉ सेंटरमध्ये पाईप टाकून पाणी ओढले जात असल्याचे उघड झाले,

तर तालुक्यातील आडगांव गावापासून पुढे टाकळी प्र. दे. गावाच्या हद्दीतून गेलेल्या मुख्य जलवाहीनीला १ इंच नेप्पल आणि पुढे १ इंच पाईपव्दारे पाणी चोरले जात असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी न.पा.तर्फे फक्त मेहुणबारे पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज करण्यात आला आहे.

परंतू वास्तवीक पाहता, गेल्या अनेक दिवसांपासून पाणी चोरीचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता. अशा आशयचा चर्चा आता दबक्य आवाजात होवू लागल्या आहेत. त्यामुळे पाणी चोरी होईपर्यंत येथील नगरपरिषदेचा पाणी पुरवाठा विभाग झोपला होता का ?

असे प्रश्‍न उपस्थित होवू लागले असून पाणी चोर्‍यांसह न.पा.च्या कामचुकार आधिकार्‍यांवर गुन्हे दाखल का करण्यात येवू नये? तसेच पाणी चोर्‍यांवर तर कठोर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com