<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>चाळीसगाव तालुक्यातील वाघळी ग्रामपंचायतीमध्ये माजी जि. प. सभापती पोपट तात्या भोळे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.</p>.<p>येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत लोकशाही पॅनलला ११, तर भाजपाचे जि.प.सद्य पोपट भोळे यांच्या भाजपा पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलला केवळ ४ जागा मिळाल्या आहेत. तर तालुक्यातील जामदा, भऊर व इतर ठिकाणी देखील भाजपाल धक्का बसला आहे. तर बहाळ येथे बाजपाच्या पं.स.च्या माजी सभापती स्मितल बोरसे यांच्या घरातील दोन उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे हा तालुक्यात भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.</p>