अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहने जप्त

अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहने जप्त

मेहुणबारे पोलिसांची कारवाई

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

मेहुणबारे परिसरातील गिरणा नदीपात्रातील अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार चाकी वाहन ओमनी व बैलगाडी मेहुणबारे पोलिसांच्या पथकाने पडकले आहेत.

या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांना पत्र पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

तालुक्यातील जमादा येथील नदीपात्रातून अवैद्य वाळूची वाहतुक करणार्‍यार्‍या दोन ओम्नी चार चाकी गाड्या, मेहुणबारे येथून १ ओमनी तर उबरखेड येथून ६ बैलगाड्या पोलिसांच्या पथकाने जप्त केल्या आहेत.

हि कारवाई मेहुणबारे सपोनि पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोहेकॉ. मिलिंद शिंदे, पोकॉ.सिद्धांत सिसोडे, गोरख चकोर, शैलेश माळी, गफ्फार शेक आदिनी केली आहे.

तसेच या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com