चाळीसगाव : वलठाण धरण शंभर टक्के भरले
जळगाव

चाळीसगाव : वलठाण धरण शंभर टक्के भरले

अभयारण्यातील लहान-मोठे बंधारे पूर्णपणे भरले

Rajendra Patil

मनोहर कांडेकर

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

पाटणादेवी परिसात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे वलठाण धरण शंभर टक्के भरले आहे,

अभयारण्य परीसरात झालेल्या मुसळधार पावसाने अभयारण्यातील लहान-मोठे बंधारे पूर्णपणे पाण्याने भरले असून हे पाणी नद्यांमध्ये आल्याने काल डोंगरी नदीवरील वलठाण धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली असून हे धरण १०० टक्के सद्यस्थितीला पाण्याने भरले आहे.

यंदा पहिल्यादाच जुर्ले महिन्यात धरण भरल्यामुळे, धरण परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. सद्यस्थितीत धरण भरुन पाणी वाहत आहे. या धरणावर तब्बल १० ते १५ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

तर शेतीसाठी देखील १० गावे अवलंबून असल्यामुळे आता या गावांचा पिण्याचा व शेतीसाठी पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे इतर लहान-मोठे प्रकल्प देखील भरण्याच्या मार्गावर आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com