चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

जगभर थैमान घालणार्या कोरोनाला हरवण्यासाठी आजपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. चाळीसगाव येथे कोवीड सेन्टरमध्ये लसीकरणाला संकाळी ११.३० शुभारंभ झाला. प्रथम वैद्यकिय आधिकारी डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी स्वता; लस टोचून घेत सर्व सहकारी कर्मचार्यांच्या मनातील भिती घालवली.

शहरातील धुळे रोड स्थित कोविड केअर सेंटरमध्ये लसीकरणास प्रारंभ झाला, याप्रसंगी प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, तहसीलदार अमोल मोरे, वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.के.लांडे, आरसीएच डॉ.बाळासाहेब वाबळे, लसीकरण समन्वयक डॉ.अजय अलई, पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह वैद्यकिय आधिकारी, आयोग्य सेवेक, आशासेविका आदि उपस्थित होते. लसीकरण सुरू होण्यापूर्वी डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी सहकार्याना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

सुरुवातीला डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी लस टोचून घेतली. त्यानतंर इतर आरोग्य आधिकारी व कर्मचार्यारी लस टप्प्या टप्प्याने टोचून घेत आहेत. डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी लस टोचल्यानतंर त्यांना एक तास निरिक्षणात ठेवण्यात आले. एक तासा दरम्यान त्याना कुठल्याही प्रकारच त्रास झाला नाही. तसेच इतर लसीकरण केलेल्या अरोग्य कर्मचार्यांना देखील कुठल्याही प्रकारचा त्रास दुपारपर्यंत जानवला नाही.

चाळीसगाव केंद्रावर लसीकरणासाठी एकूण ६५० कर्मचार्यांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार सुरुवातीला ४५० लस उपलब्ध झाल्या आहेत. शनिवारी लसीकरणास प्रत्यक्षात प्रारंभ झाला असून दिवसभरात १०० कोरोना योध्दांना लस टोचण्यात येणार आहे. तर चार आठवड्यानतंर पुन्हा दुसरा ठोस लस घेतलेल्यानाच देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.डी.के.लांडे यांनी दिली. लसीकरणासाठी चार कक्षाची निर्मिती करण्यात आली असून लसीकरणासाठी येणार्यांचे आगोदर ओळखपत्र तपासले जाते, त्यानतंर त्यांनी दुसर्या कक्षात तपासणीसाठी नेले जाते, प्रत्यक्षात लसीकरणासाठी एक कक्षात नेले जाते. आणि लसीकरण झाल्यानतंर तासभर स्वतंत्र कक्षात निरिक्षासाठी बसविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

सेल्फी काढून लसीकरणाचा आनंद

कोरोना विरोधात लढण्यासाठी आलेल्या लसीकरणाचा आनंद घेण्यासाठी चाळीसगाव येथे लसीकरणाचा आनंद येथील नर्सने सेल्फी काढुन घेतला. डॉक्टारांनी लस टोचल्यानतंर सहकारी नर्सने आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेत आनंद व्यक्त केला.

मी स्वता;प्रथम लस टोचून घेतली आहे. लसही अत्यंत सुरक्षित आहे. लसीचे कुठल्याही प्रकारचे साईटइफेक्ट नाहीत, त्यामुळे इतरांनी देखील लसीकरण करुन घ्यावे. लसीकरणाबाबत भिती बाळगू नये.
डॉ.बी.पी.बाविस्कर, वैद्यकिय आधिकारी