चाळीसगाव : दोन खासगी कोविड रुग्णालयांना नोटीस

जन आरोग्य योजनेचा मोफत लाभ न देता रुग्णांकडून केली बिलाची आकारणी तीन दिवसांत खुलासा दिला नाहीतर कायेदेशिर कारवाई होणार
चाळीसगाव : दोन खासगी कोविड रुग्णालयांना नोटीस

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत संलग्न असलेल्या खासगी कोविड रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर योजनेचा लाभ न देता इतर रुग्णांप्रमाणे बर्‍याच रुग्णाकाकडून बिल आकारल्याचा प्रकार चाळीसगावातील दोन खाजगी रुग्णालयांनी केला आहे. या रुग्णालयांनी शासनाच्या कराचा भंग करुन एक प्रकारे रुग्णांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. याबाबत नियमांचा भंग केला म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांनी येथील दोन रुग्णालयाना १० मे रोजी नोटीसा बजवल्याची माहिती मिळाली आहे. या रुग्णालयांना तीन दिवसांमध्ये खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे, नाहीतर कायेदेशिर कारवाई होणार आहे.

राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचारासाठी जनआरोग्य योजना सुरु केली आहे. त्यातील २० आजारात कोरोना उपचाराचा समावेश असून रुग्णालयांनी कोविड रुग्णांसाठी २० टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक आहे. असे असतानाही चाळीसगाव येथील बापजी जीवनदीप हॉस्पिटल व कृष्णा क्रिटीकल या रुग्णालयांमध्ये रुग्णांना योजनेंतर्गत बेड उपलब्ध करुन न देता खासगी रुग्णालयाच्या नियमानुसार बिल आकारणी केली आहे. या योजनेचे जिल्हा समन्वयक गोपाळ जोशी यांनी तपासणी केली असता ही बाब समोर आली. त्यांनी या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक तथा कोरोना ऑफिसर डॉ. एन. एस. चव्हाण यांना अहवाल दिला. त्यानुसार या दोन्ही रुग्णालयांना नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा मागवण्यात आला आहे. तो जर आला नाही तर कायेदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत २० आजारांवर उपचाराची सुविधा असल्याने पात्र लाभार्थ्यांना विनामुल्य उपचार करुन योजनेनुसार शासनाकडून बिल घ्यायला हवेे होते. परंतू बापजी जीवनदीप हॉस्पिटल व कृष्णा क्रिटीकल या रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना दाखल करुन त्यांचा योजनेत समावेश केला नाही. त्यांच्याकडून खासगी रुग्णालयाच्या नियमानुसार सरसकट बिल आकारणी केली. म्हणजेच सशुल्क उपचार केल्याची उघड झाल आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत चाळीसगाव येथील दोन रुग्णालयात कोरोनावर विनामुल्य उपचार होणे अपेक्षित आहे. परंतू ते झाले नाहीत, त्यांनी बर्‍याच रुग्णाकडून मोफत उपचार न करता जादा बिलाजी आकारणी केली आहे. ही पेशंटची फसवणूक असल्याने शासनाच्या कराराचा भंग झाला आहे. त्यामुळे मी त्यांना नोटीसा बजावल्या असून खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानतंर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

डॉ. नागोजीारव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com