चाळीसगाव : दोन पॉझिटिव्ह तर १० जण करोनामुक्त
जळगाव

चाळीसगाव : दोन पॉझिटिव्ह तर १० जण करोनामुक्त

५१ जणांचे स्वॅब घेतले ; ८१ अहवालाची प्रतिक्षा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

चाळीसगाव - Chalisgaon

चाळीसगाव कालच १७ कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले होते.आज पुन्हा जळगाव येथे उपचार घेत असलेले चाळीसगावच्या दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. त्यात एक शहरातील जहागीरदार वाडी येथील रहिवाशी आहे.

तर समाधानाची बाब म्हणजे शुक्रवारी १० जाणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना कोविड केअर सेन्टरमधून मोठ्या उत्साहात घरी सोडण्यात आले. तसेच दिवसभरात काल आढळुन आलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील संशयित ५१ जणांचे स्वॅब घेण्यात आले असून ते जळगाव येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे.

तर काल पाठविलेल्या ८१ जणांच्या सॅबच्या अहवाल प्रलंबित असून त्यांचे रिर्पाट रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तालुक्यात एकीकडे शहर आणि तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या दहा दिवसांपूर्वी येथील बाराभाई मोहल्ल्यातील कोरोना पॉझीटिव्ह जळगांव येथे उपचारार्थ दाखल झालेल्या ५५ वर्षीय इसमाच्या संपर्कातील त्याच्याच कुटुंबातील १० जण कोरोना बाधीत आढळून आले होते. आज या सहापैकी ९ जणांनी कोरोनावर मात केली असून आज त्यांना चाळीसगांवच्या कोवीड सेंटरमधून सोडण्यात आले. तर अन्य १ कोरोना मुक्त हा देखील चाळीसगांव शहरातीलच असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com