चाळीसगाव : बिलाखेड व भोरस येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह
जळगाव

चाळीसगाव : बिलाखेड व भोरस येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह

संपर्कात आलेल्या व्यक्तींचे शोध घेण्याचे काम सुरु

Ramsing Pardeshi

चाळीसगाव | प्रतिनिधी

चाळीसगाव शहरातील सिंद्धी कॉलनी येथील एक कापड व्यापारी नाशिक येथे आज कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला होता. त्या पाठोपाठ आता तालुक्यातील बिलाखेड येथील एक पुरुष व भोरस येथील एक महिला अशा दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या स्वॅबचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय आधिकार्‍यांनी दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेण्याचे काम चालू असून संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येवून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com