चाळीसगावात वादळाचा तडाखा ; वृक्ष उन्मळून पडले

संपूर्ण लाकूड स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कारांसाठी दान
चाळीसगावात वादळाचा तडाखा ; वृक्ष उन्मळून पडले

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यात काल सुसाट्याचा वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला, तर आज(सोमवारी) संकाळ पासूनच वादळी वारा सुरु झाला आहे. त्यामुळे शहारातील भडगाव रोडस्थित पाठण हवालदार यांच्या बिल्डींग समोरील लिंबाचे ४० वर्षांपूर्वीचे झाड उन्मळून पडले आहे. झाड इलेक्ट्रीक तारांवर पडल्यामुळे दोन इलेक्ट्रीक पोल वाकले असून त्या भागातील इलेक्ट्रीक प्रवाह खंडीत झाला आहे. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.

चाळीसगावात वादळाचा तडाखा ; वृक्ष उन्मळून पडले
Tauktae Cyclone चक्रीवादळाचा मुंबईला जबरदस्त तडाखा

घटनास्थळी महाविद्यातूचे कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी विद्युत प्रवाह सुरु करण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न चालू केले आहेत, तर उन्मळून पडलेले लिंबाच्या झाडाचे संपूर्ण लाकूड स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कारांसाठी देण्यात आले आहे. तसेच काल दुपारी करगाव रोड आशा हॉस्पीटल समोर झाड उन्मळून पडले आहे. तर ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. पडलेले झाडे उंचल्यासाठी न.पा.च्या पथकाला देखील माहिती देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com