अवैध वाळू वाहतुक करणारे पाच ट्रॅक्टर जप्त

ट्रॅक्टर जप्त करून मेहुणबारे पोलिसांच्या ताब्यात
अवैध वाळू वाहतुक करणारे पाच ट्रॅक्टर जप्त

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील गणपूर शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर व वडगाव लांबे येथे दोन ट्रॅक्टरवर असे अवैद्यरित्या वाळू करणारे तब्बल पाच ट्रॅक्टारांवर कारवाई करण्यात आली आहे.

तहसीलदार अमोल मोरे यांनी आपल्या पथकासोबत उपस्थित राहत ही कारवाई केली आहे.लॉकडाऊनचा फायदा घेत वाळू माफिया गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी करत आहेत. बैलगाडी, ओमनी कार, ट्रॅक्टर अशा वाहनाद्वारे वाळू चोरून ती चढ्या भावाने विकली जात आहे.

अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांनी पथके नेमली आहेत. तहसीलदार अमोल मोरे हे या पथकातील नायब तहसीलदार विशाल सोनवणे, खडकी मंडळाचे मंडळ अधिकारी वाय.पी. सोनवणे, हातलेचे मंडळ अधिकारी एस.एम. मोरे, तळोंदेचे तलाठी नीलेश अहिरे, माळशेवगेचे तलाठी आनंद शिंदे, तळेगावचे तलाठी राज डोंगरदिवे यांच्यासोबत गस्त घालत असताना शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गणपूर शिवारातील नाल्यात वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले.

पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. या ट्रॅक्टरांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली.

वडगाव लांबे येथे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार मोरे यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री २ वाजता उंबरखेडचे तलाठी डी.एस. येडे, कुंझरचे तलाठी रवींद्र नन्नवरे, रांजणगावचे तलाठी चेतन देवरे यांच्या पथकाने कारवाई करत वाळूची अवैध वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. हे दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून मेहुणबारे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या सर्व टॅक्टरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतू दंडात्मक कारवाई न करता थेट गुन्हे दाखल करावे अशी देखील मागणी पर्यावरण प्रेमीकडून होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com