चाळीसगाव : तीन जण करोना पॉझिटिव्ह ; चार करोनामुक्त
जळगाव

चाळीसगाव : तीन जण करोना पॉझिटिव्ह ; चार करोनामुक्त

६१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी रवाना

Rajendra Patil

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

चाळीसगाव शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांमध्ये वाढ होत असून आता नव्याने पुन्हा तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यात तालुक्यातील पातोंडा येथील एक जण, शहरातील सिंधी कॉलनी एक वजहागीरदार वाडी- एक असे एकूण तीन जण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.

आज ३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तीन जण पॉझिटिव्ह आल्याची वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे. तर चार जणांनी करोनावर मात केली असून त्याना येथील कोविड केअर सेन्टरमधून घरी सोडण्यात आले आहे. तर आज पुन्हा ६१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com