चाळीसगाव :  कापड व्यापारी नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह
जळगाव

चाळीसगाव : कापड व्यापारी नाशिक येथे कोरोना पॉझिटिव्ह

चाळीसगाव सिंधी कॉलनीत प्रशासनाचे पथक दाखल

Ramsing Pardeshi

चाळीसगाव - प्रतिनिधी

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एक मोठा व्यापारी नाशिक येथे कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे. त्याला गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्रास होत असल्याने नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याची स्वँबची तपासणी केली असता, तो करुणा पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सिंधी कॉलनीत प्रशासनाचे पथक दाखल झाले असून पॉझिटिव्ह कोरोना पॉझिटिवच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. दरम्यान हा व्यापारी चाळीसगावातील कापड उद्योग संबंधित मोठा व्यापारी असल्याचे सांगण्यात येत आहे. चाळीसगावात दररोज वाढणारी रुग्ण संख्या ही धोक्याची घंटा असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असून शक्य असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com