चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यात बुधवारी (दि.६) रात्री ११ वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी जोरदार पाऊस पडला. यामुळे मक्यासह हरबरा, भुईमुग, शाळू आदि पिके जमीनदोस्त झाली, तर गुरुवारी देखील दुपारनतंर बर्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने अनेकाच्या लग्नात पावसाने व्यत्यय आनला होता.

तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. बुधवारी सायंकाळी अचानक वातावरण बदलामुळे पावसाची शक्यता व्यक्त झाली होती. रात्री ११ वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुमारे अर्धा तास झाला.

वादळासह अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने, शेतकर्याचा मक्का, भुईमूग, हरबरा, शाळूची पिके जमीनदोस्त झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे पिकांचे नूकसान झाल्याने बर्याच शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारी देखील संकाळपासूनच पावासाचे वातावरण होते.

दुपारी ३ वाजेच्या दरम्यान पावासने तालुक्यात तुरळक हजेरी लावली. परंतू त्यानतंरही पावसाचे वातावरण होते. बुधवारी पडलेल्या पावसामुळे गारठा वाढला. दरम्यान, अचानक पाऊस सुरू झाल्याने अनेकांची धावपळ उडाली. चाळीसगाव बाजार समितीत काही व्यापार्यांचा माल देखील ओला झाल्याने नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.