हिरापुर येथे एकावर तलवारीने वार
जळगाव

हिरापुर येथे एकावर तलवारीने वार

Manohar Kandekar

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील हिरापूर येथे उधार दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरुन एक तरुणावर तलवारीने वार करुन, जिवेठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशनला चौघांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

ऋषीकेश संजय पाटील रा.हिरापूर यांचा भाऊ कल्पेश पाटील हा सौरव विजय निकुभ यांच्याकडे उधार दिलेले पैसे वारंवार मागत असल्याने, याचा राग येवून सौरव विजय निकुंभ, सार्थक विजय निकुंभ व विजय निकुंभ आशा मिळुन कल्पेश याला शिवीगाळ करत मारहाण केली.

तसेच सौरव व गौरव यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉड व तलवारीने कल्पेशच्या डोक्यात वार केला, यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी ऋषीकेश संजय पाटील यांच्या फिर्यादीवरुन सौरव विजय निकुंभ, गौरव विजय निकुंभ, सार्थक विजय निकुंभ व विजय निकुंभ यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भादवी कलम ३०७,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय सुरेश शिरसाठ करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com