चाळीसगाव : धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावा

चाळीसगाव : धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावा

धनगर समाज बांधवांची आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी-

धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसारधनगर समाजाच्या आरक्षणासह विविध मागणीसाठी येथील धनगर समाज बांधवांनी आमदार मंगेश चव्हाण यांना निवेदन देवून प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांना धनगर समजाच बांधवाचे प्रश्‍न समजून घेत, ते तडीस लावण्याचे आश्‍वासन उपस्थितांना दिले. या निवेदनावर धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. विजय शिरसाठ, चाळीसगाव धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष साहेबराव नाना आगोणे, वाघळीचे सरपंच सुनील हाडपे, सामाजिक कार्यकर्ते धर्मा बच्छाव, स्वप्निल वैदकर, योगेश साबळे सर, धनंजय बोरसे सर, सागर आगोणे, अतुल हाडपे , अनिल हडपे, अप्पा साहेब देवरे आदि समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आशा आहेत,मागण्या-

येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करा, जे आदिवासींना तेच धनगरांना याप्रमाणे मागील वर्षीचे १००० कोटी व चालू वर्षी चे १००० कोटी याप्रमाणे एकूण दोन हजार कोटी उपलब्ध करून देणे, मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे, राजे यशवंतराव होळकरांचे भव्यदिव्य असे स्मारक उभारावे तसेच, चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रस्त्यावर असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com