बायोमेट्रिक पद्धतीला रेशन दुकानदारांचा विरोध

बायोमेट्रिक पद्धतीला रेशन दुकानदारांचा विरोध
तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देतांना रेशन दुकानदार

चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह संख्या दिवसेंदिवस वाढत असून सातशेचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जनजीवन भयभीत झाले आहे. दुसरीकडे या महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून रेशन माल घेण्यासाठी सरकारने पुन्हा बायोमेट्रीक पद्धत लागू केली आहे.

मात्र कोरोनाच्या धास्तीने रेशन दुकानदारांनी बायोमेट्रीक पद्धतीला विरोध केला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांचे अंगठे प्रमाणीत करून रेशन माल वाटपाची परवानगी द्यावी अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.याबाबतचे निवेदन काल(दि,११)तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशन धान्य घेण्यासाठी ग्राहकांना थंब (अंगठा) पद्धत बंद केली होती. मात्र ही पद्धत तालु्क्यात पुन्हा या महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेसह स्वस्त धान्य दुकानदारंाकडून रोष व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गोरगरीबांसाठी दोन किलो गहू, तांदूळ तसेच डाळी मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

येत्या नोव्हेंबरपर्यत मोफत धान्याचा लाभ रेशन ग्राहकांना मिळणार आहे.तालुयातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. लॉकडाऊनमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था धो्क्यात आली होती. मोफत धान्य योजनेमुळे काही अंशी गोरगरीबांना आधार मिळत होता. त्याचवेळी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व सर्व जनतेला स्वस्त आणि मोफत धान्याचा लाभ मिळावा म्हून थंब पद्धत तात्पुरती बंद केली होती.मात्र राज्यात कोरोनाचे संकट कमी न होता वाढत आहे. कोरोनाची भिती गावागावात वाढत आहे.

काही गावांमध्ये कोरोनाचे रूग्णही वाढत आहे. अशा स्थितीत बायोमेट्रीक पद्धतीने रेशन दुकानावर धान्य वाटप झाले तर मशिनवर वारंवार दिल्या जाणार्‍या अंगठ्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून दुकानदार सॅनेटायझरचा वापर करतात मात्र काही गावांची लोकसंख्या जास्त तर दुकानांची संख्या कमी आहे. त्यातच ग्राहकांना धान्य घेण्याची घाई झालेली असते.

मशिनवर अंगठा देण्याची पद्धत सुरु केल्याने एका ग्राहकाला धान्य देण्यासाठी पाच मिनीटांपेक्षा जास्त वेळ लागतो.ही स्थिती पाहता बायोमेट्रीक पद्धत काही दिवस बंद ठेवावी व स्वस्त धान्य दुकानदारांचे अंगठे प्रमाणीत करून लाभार्थ्यांना माल वाटपाची परवानगी मिळावी. यासंबंधीते निवेदन देण्यासाठी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष महेश शेलार, गणेश निकुंभ, सुनिल देशमुख, किशोर वाणी, अब्रार मुल्ला आदि उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com