चाळीसगावात एकाच रात्रीत 123 मीमी पाऊसाची नोंद

वाकडीतील महिलेचा पुरात वाहून मृत्यू; 15 हजार 915 हेक्टर शेतीचे नुकसान
चाळीसगावात एकाच रात्रीत 123 मीमी पाऊसाची नोंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप होती. मात्र दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला Torrential rain सुरुवात झाली आहे. सोमवारी दिवसभरात चाळीसगावात Chalisgaon 123.2 मिलीमीटर पाऊस 123.2 mm of rainfall पडला असल्याने आतापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद The highest rainfall recorded करण्यात झाली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एक महिलेसह 506 जनावरे वाहून गेली असून 15 हजार 915 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने District Administration दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप मिळाल्याने शेतीचे कामे जोमात सुरु होती. मात्र रविवारी हवामान खात्याकडून राज्यात वादळीवार्‍यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवार पासून जिल्ह्याला मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यातच चाळीसगाव तालुक्यात सोमवारी दिवसभरासह मध्यरात्रीत सुमारे 123.2 मिलीमीटर पाऊस झाल्याने ढगफुटी झाली. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात सरासरी 152.2 मिलीमीटर पाऊस झाला असून यात सर्वाधिक पाऊस हा 328.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

नदीकाठच्या गावांसह शहराला पुराचा वेढा

एकाच रात्री शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शहरातून वाहणार्‍या नद्यांना पुर आला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांसह शहरातील काही भाग पाण्याने वेढला गेला होता. यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील 32, पाचोरा 4 तर भडगाव तालुक्यातील 2 असे एकूण 38 गावांना पुराचा वेढा पडला आहे.

या गावांना बसला पुराचा फटका

शहरातून व शहरालगत वाहणार्‍या तितूर व डोंगरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. यामध्ये चाळीसगाव शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसर, वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेर्डे, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी प्र.चा. या गावांतील सुमारे 50 ते 60 घरामध्ये पुराचे पाणी शिरले असल्याने संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील 506 गावातील मोठी गुरे तर लहान 155 लहान पशूधन पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुरात वाहून महिलेचा मृत्यू

अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने वाकडी गावातील कलाबाई सुरेश पवार (वय 60) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामध्ये चाळीसगावात 617, पाचोर्‍यात 6 तर भडगावमध्ये 4 असे एकूण 637 घरांची अंशत: पडझड झाली असून 38 घरे पुर्णपणे जमीन दोस्त झाली आहे. यात चाळीसगावमधील 20, पाचोर्‍यातील 18 अशांचा समावेश आहे. तर चाळीसगावातील 300 दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले आहे.

एसडीआरएफच्या पथकाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर

अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटे कन्नड घाटात सुमारे आठ ते दहा ठिकाणी दरड कोसळली आहे. एसडीआरएफचे पथकाकडून वाहतुक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. घाटात अनेक वाहने अडकून पडली असून वाहतुक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच पुरामुळे स्थालांतरीत केलेल्या नागरिकांना हायस्कुलमध्ये स्थालांतरीत करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com