चाळीसगाव : मार्केटमध्ये रेशनचा काळाबजारासाठी आणलेला ट्रक पकडला ?

चाळीसगाव : मार्केटमध्ये रेशनचा काळाबजारासाठी आणलेला ट्रक पकडला ?

ट्रकमध्ये हजारो रुपयांचा रेशनचा माल

मनोहर कांडेकर - चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये(मार्केट) एका व्यापर्‍याकडे रॅशनचा मालाने भरलेली पाढर्‍या रंगाचा १० चाकी ट्रक (क्र.एमएच १९,झेड,०८९०)पकडण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ही ट्रक शासकिय रेशनचा माल घेवून, विक्रीसाठी मार्केटमध्ये आल्याची एकाला कुणकुण लागण्याने, तोडीपानीच्या उद्देशाने त्याने ट्रक पकडला, रॅशनच्या मालासह ती सध्यस्थिती घटनास्थळी उभी आहे.

या ठिकाणी काही राजकिय पुढारी व काही तोडीपानी करणारे देखील उपस्थिती असून चिरीमिरी घेवून प्रकरण दाबण्याची प्रयत्न सुरु असल्याची माहिती विश्‍वसीय सुत्रांनी दिली आहे.

परंतू घटनास्थळी अद्याप तहसीलदार किवा महसूल प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी देखील पोहचला नसल्याचे समजत असून या ट्रकमध्ये शासनाचा हजारो रुपयांचा रेशनचा मॉलअसल्याचे कळते आहे. यात आता जिल्हाधिकार्‍यांनी त्वरित लक्ष घालून, गरींबाच्या तोडातील घास काढुन व्यापार्‍यांच्या तोंडात घालणार्‍या रॅशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची गरज आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com